- वाकड पोलीसांची कारवाई; तिघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १०. जुलै. २०२१) :-.डांगे चौकामधून तंबाखू व पानमसाल्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार त्यांनी हॉटेल ब्लू वॉटर परिसरात सापळा लावला.
रात्री साडे अकराच्या सुमारास बनावट नंबर असलेल्या टेम्पोला (एमएच १८ एए ९४२१) अडवून तपासणी केली. टेम्पोत १०० पोती तंबाखू आणि १०० पोती पानमसाला होता. त्याची एकूण किंमत ५२.२० एवढी आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना अटक केली आहे.
गणेश वंजी साबळे (वय २९, रा. साक्री, धुळे), संदीप गुलाब ठाकरे (वय २७, रा. साक्री, धुळे) व विशाल पांडुरंग लवाळे (वय २२, रा. मुळशी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.