- महिलेला बघून घेण्याची धमकी; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२१) :- मैत्रिणीसोबत मॉर्निंग वॉकसाठी जात असताना दिघीतील एका किराणा दुकानासमोर काळ्या रंगाच्या स्प्लेंडर दुचाकीवरून दोन अनोळखी मुले आली. दुचाकी चालवत असलेल्या मुलाने एका महिलेशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला.
दुचाकीवर मागे बसलेल्या मुलाने महिलेला बघून घेण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. ९) पहाटे सव्वा पाच वाजताच्या सुमारास दिघीत घडली. महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.
















