न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२१) :- चिखलीतील मोरेवस्ती परिसरातील साने कॉलनी रस्त्यात एकावर धारदार हत्याराने वार करीत डोक्यात दगड मारून निर्घृणपणे खून करण्यात आला आहे.
आज रविवारी दुपारच्या सुमारास दिवसाढवळ्या ही घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. कानिफनाथ क्षीरसागर (रा. पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















