- लोणावळा व भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना आर्थिक दंड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२१) :- करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाला मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटक लोणावळ्यातील अनेक ठिकाणे व भुशी डॅमवर गर्दी करताना दिसून येत आहेत.
पालकमत्री अजित पवार यांनी नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे तसेच, पोलिसांना अशा प्रकरणी लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही नागरिकांनी भुशी डॅम आणि अन्य ठिकाणांवर पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
पुणे, पिंपरी चिंचवड आणि मुंबईवरुन नागरिक या ठिकाणावर येत आहेत. भुशी डॅम, लायन पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणांवर पर्यटकांनी प्रामुख्याने गर्दी केल्याचे पहायला मिळाले. पर्यटक पोलिसांना खोटे कारण सागून पर्यटन स्थळावर जात आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून, पोलीस पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. शनिवारी २६३ नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत एक लाख २३ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कारवाई सुरूच आहे. वीकेंड लॉकडाऊन’ शनिवारी (दि. १०) पोलिसांनी विनामास्कच्या आदेशाचा भंग करणाऱ्या १५८ जणांवर कारवाई केली.
शनिवारी पोलिसांनी केलेली कारवाई एमआयडीसी भोसरी (०२), भोसरी (१४), चिंचवड (१२), निगडी (१४), चाकण (१७), दिघी (०१), सांगवी (१२), वाकड (१८), हिंजवडी (०२), देहुरोड (१८), तळेगाव दाभाडे (२८), चिखली (८), रावेत चौकी (४).
















