- पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२१) :- पिंपरीत सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबूून खून करून मृतदेह एच.ए मैदानावर टाकून देण्यात आला होता. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या घटनेचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी छडा लावला असून, आरोपीची थेट उत्तरप्रदेशमध्ये जाऊन गचांडी धरली आहे.
आरोपी हा घटने दरम्यान पिंपरीत राहत होता. वासनांध झालेल्या आरोपीने दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. ही घटना सप्टेंबर २०१८ मध्ये घडली होती.
उत्तर प्रदेशमधील कानपूरनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांची चार जणांची टीम कानपूरच्या साढ पोलीस ठाण्यात पोहोचली. राजकुमार उर्फ प्यारेलाल चंद्रप्रकाश कुरील (वय ३२, रा. वामीपुरबा, पोस्ट – बिरसिंहपूर, ता. घाटमपूर, जि. कानपूरनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
















