- तब्बल २१ जणांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२१) :- मावळमधील शिवणे येथे बैलगाडा घाटात रविवारी (११ जुलै) सकाळी दहाच्या सुमारास बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. कोविड नियमांचं उल्लंघन करत शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
बैलांना जुंपून बैलगाडा चढणीच्या रस्त्याने घाटात पळवण्यात आला. पोलीस कर्मचारी आशिष अर्जुन काळे यांनी वडगाव मावळ पोलिसांत गाडा मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गणेश दत्तात्रय म्हस्के, हनुमंत शिवाजी म्हस्के, विक्रम बाळासाहेब केडे, आदिनाथ बाळू गराडे, आदिनाथ बाळू म्हस्के, मनोज अंकुश ढोरे यांच्यासह २१ जणांवर गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

















