- पोलिसांकडून दोघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२१) :- चिखलीतील मोरेवस्ती परिसरातील साने कॉलनी रस्त्यात एकावर धारदार हत्याराने वार करीत डोक्यात दगड मारून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. रविवारी दिवसाढवळ्या ही घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान पोलिसांनी घटनेचा तपास करीत दोघांना अटक केली आहे. जागेवरील अतिक्रमण व त्याचा वाद व आपसातील जुन्या भांडणाच्या कारणावरून खून झाल्याचे तपासात उघड झाले आहे.
आकाश उर्फ मकसूद विजय जाधव (रा. रामनगर, चिंचवड), शिवराज अविनाश ननावरे (रा. रुपीनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मृत व्यक्तीचा मंडप व्यावसायिक होता. कानिफनाथ लक्ष्मण क्षीरसागर (वय ३८, रा. परशुराम चौक, विद्यानगर, चिंचवड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















