- तोंडावर मिरची पूड टाकून नऊ लाखांची चोरी; रावेतमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२१) :- फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादीला कमी किमतीत सोने देतो असे सांगितले. सोने देण्यासाठी आरोपीने फिर्यादीला मुंबई-सातारा सर्व्हिस रोड, रावेत येथे नेले.
तिथे दुचाकीवरून आरोपीचे साथीदार आले. आरोपींनी फिर्यादीला धक्काबुक्की व मिरची पूड तोंडावर टाकली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून फिर्यादीच्या गाडीतील ९ लाख रुपये रोख रक्कम आरोपींनी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना ८ जुलै सायंकाळी घडली.
रमेश हिराचंद बाफना (वय ४६, रा. कॅम्प पुणे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर भालेराव आणि साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
















