- पिंपरीतील घटना; तपासानंतर अल्पवयीन मुलाची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२१) :- पिंपरीतील एचए कॉलनीच्या गेटसमोर तिघेजण घातक शस्त्र घेऊन आले असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कोयता बाळगल्या प्रकरणी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.
समजपत्र देऊन त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचे दोन्ही साथीदार दुचाकी (एम एच १४ / बी एफ ४०६६) वरून पळून गेले. पोलीस शिपाई रमेश दोरताले यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुमित धोत्रे, कृष्णा (दोघे रा. गांधीनगर, पिंपरी) व त्यांच्या अल्पवयीन साथीदारावर गुन्हा नोंदवला आहे. ही घटना रविवारी (दि. ११) रोजी घडली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















