- गरोदर महिलांचे कोविड लसीकरण उद्या बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी (दि. १३) रोजी ‘ कोव्हॉक्सीन ’ लसीचा डोस १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी फक्त दुसरा डोस हा १०० टक्के कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग ओपन होईल.
स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामाता पार्क, फुलेनगर, नवीन भोसरी रुग्णालय या दोन लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने डोस मिळेल.
तसेच उद्या वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवसानंतर देण्यात येणार आहे. याअनुषंगाने लसीकरणाचा डोस निळु फुले नाटयगृह, सांगवी, इ.एस.आय.एस हॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड या दोन लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत दुसरा डोस हा १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
वय ४५ वर्षावरील सर्व लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावरदि.१३/०७/२०२१ रोजी सकाळी ०९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण उद्या दि.१३/०७/२०२१ रोजी बंद राहील. “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही.
















