- महापालिका आयुक्तांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जुलै २०२१) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थापत्य, विद्युत, आरोग्य विभागातील अधिका-यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने एकाच विभागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या अधिका-यांची माहिती मागविली होती. त्यानुसार एकाच विभागात अनेक वर्ष कार्यरत असलेल्या अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या.
त्यात ३ सहशहर अभियंता, ८ कार्यकारी अभियंता, २९ उपअभियंता आणि ४ सहायक आरोग्य अधिकारी अशा ४४ अधिका-यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी सुट्टीच्या दिवशी रविवारी काढले. अधिकारी, कर्मचा-यांनी १५ दिवसाच्या आत बदली ठिकाणी रुजू व्हावे; अन्यथा प्रशासकीय कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
सह शहर अभियंता मकरंद निकम – बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण, अतिक्रमण निर्मुलन, अशोक भालकर – स्मार्ट सिटी, ड व ह क्षेत्रीय कार्यालय, पंतप्रधान आवास योजना, ईडब्लूएस, सतीश इंगळे – झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नवसन, क्रीडा, उद्यान स्थापत्य विभाग. कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे – क क्षेत्रीय कार्यालय, राजेंद्र राणे – पाणीपुरवठा व जलनि:सारण, संजय भोसले – बांधकाम परवानगी, संजय घुबे – बांधकाम परवानगी विभाग. विद्युत कार्यकारी अभियंता – शशिकांत मोरे क क्षेत्रीय कार्यालय, संजय खाबडे यांची फ क्षेत्रीय कार्यालय, नितीन देशमुख यांची मुख्य कार्यालय आणि प्रवीण घोडे यांची अ क्षेत्रीय कार्यालयात बदली केली आहे. तर, उपअभियंता लता बाबर यांची इ क्षेत्रीय विद्युत कार्यालय आणि बाळू लांडे यांची अ क्षेत्रीय विद्युत कार्यालयात बदली केली आहे. सुनिल शिंदे क क्षेत्रीय, नरेश रोहिला मुख्य स्थापत्य, विजय भोजने बांधकाम परवानगी, दिपक पाटील ग क्षेत्रीय पाणीपुरवठा, विजय जाधव पाणी पुरवठा, मोहन खोंद्रे स्थापत्य मुख्य, सुभाष काळे नगररचना, चंद्रशेखर धानोरकर बीआरटीएस, वैभव पुसाळकर क्रीडा स्थापत्य, सुनिल पाटील स्थापत्य मुख्य, सुनिल नरोटे ड क्षेत्रीय स्थापत्य, लक्ष्मण जाधव ई क्षेत्रीय, संध्या वाघ ग क्षेत्रीय, देवेंद्र बोरावके स्थापत्य उद्यान, राजेद्र शिंदे फ क्षेत्रीय, सतीश वाघमारे स्थापत्य मुख्य, भाऊसाहेब साबळे नगररचना, विनय ओव्हाळ ड क्षेत्रीय, महेश तावरे ग क्षेत्रीय कार्यालय, जयकुमार गुजर ह क्षेत्रीय स्थापत्य, रविंद्र भोकरे पाणीपुरवठा, बाळासाहेब शेटे अ क्षेत्रीय, प्रकाश सगर क क्षेत्रीय, नरेश जाधव पर्यावरण, राजेंद्र क्षीरसागर उद्यान स्थापत्य, राजकुमार सुर्यवंशी नगररचना आणि विजयकुमार शिंदे यांची पाणीपुरवठा व जलनि:सारण विभागात बदली केली आहे. सहायक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे यांची क क्षेत्रीय कार्यालय, महादेव शिंदे ब क्षेत्रीय, कुंडलिक दरवडे अ क्षेत्रीय आणि बाबासाहेब कांबळे यांची आरोग्य विभागात बदली केली असून त्यांच्याकडे अतिरिक्त आरोग्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार कायम ठेवला आहे.