- एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२१) :- ‘तू आमच्याकडे का बघतो. तुला लय माज आला का? तुला खल्लास करून टाकतो’, अशी दमबाजी केली. त्यानंतर दोघांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कोयत्याने वार केले. तर अन्य दोन आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रवीण बबन लांडगे (वय २३, रा. फुलेनगर, एमआयडीसी) भोसरी यांनी फिर्याद दिली आहे.
याउलट आरोपींनी फिर्यादी यांच्या मेहुण्याला मारहाण केली. त्याचा फिर्यादी यांनी आरोपींना जाब विचारला. त्यावरून आरोपी यांनी फिर्यादी यांना ठार मारण्याच्या उद्देशाने शस्त्राने डोक्यावर, हातावर वार करून गंभीर जखमी केले. अन्य आरोपींनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अस्लम हनीफ चाकोरे (वय ३२, रा. फुलेनगर, एमआयडीसी भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.
डीप्श्या उर्फ सूरज गायकवाड, जावेद नदाफ (दोघे रा. फुलेनगर, एमआयडीसी भोसरी), अजय ससाणे, अण्ण्या हजारे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना रविवारी (दि. ११) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.


















