- व्हिडिओ व्हायरल झाल्याने वधूसह इतरांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२१) :- भोसरीतील सहकार कॉलनी चक्रपाणी वसाहत येथील वधूने मंगळवारी सकाळी ११ वाजता विवाह सोहळ्यासाठी जाताना दिवे घाटात चक्क गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास केला होता. या प्रसंगाची व्हिडिओग्राफर मार्फत शूटिंग देखील सुरु होती.
गाडीमध्ये मुलीचे नातेवाईक देखील उपस्थित होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्कॉर्पिओ गाडी चालक हयगयीने गाडी चालवत होता. इतरांच्या जिवितास धोका निर्माण होईल असे वर्तन करत होते. तसेच चेहऱ्यावर मास्कही नसल्याने त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गाडीचा चालक. बोनेटवर बसलेली वधू आणि व्हिडिओग्राफर यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम २६९,१८८,२७९,१०७,३३६,३४, आपत्ती व्यवस्थापन कायदा २०५ कलम ५१ब आणि महाराष्ट्र कोविड उपाययोजना कलम २०२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












