- चिंचवडमधील घटना; बाप व मुलावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२१) :- महिलेने आमच्या बाजूच्या भिंतीस रंग देऊ नका, असे पेंटरला सांगितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपीने ‘चल हड, तू कर रे पेंटींग, काय करते ही’, असे अपशब्द वापरले. आरोपीने महिलेकडे पाहून शिट्ट्या मारत गाणी म्हणत विचित्र हावभाव करून त्यांचा विनयभंग केला.
ही घटना संभाजीनगर, चिंचवड येथे सोमवारी (दि. १२) दुपारी घडली. महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भाऊसाहेब दशरथ पाटील (वय ४९), अजिंक्य भाऊसाहेब पाटील (वय २२, दोघेही रा. संभाजीनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या पिता-पुत्राचे नाव आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.