- तरून गंभीर जखमी; वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२१) :- फिर्यादी त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी नढेनगर, काळेवाडी येथे गेले. मात्र, मित्र गावी गेल्याने काहीवेळ ते मित्राच्या घराबाहेर बसले. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी याने ‘तू कोण रे ? इथे का बसलास?’ अशी विचारणा करीत शिवीगाळ केली.
त्यानंतर विळ्याने फिर्यादीवर वार करीत त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. ११) रात्री नढेनगर -काळेवाडी येथे घडली. रवींद्र शहाजीराव गायकवाड (वय ३६, रा. भारतमाता चौक, काळेवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रभाकर प्रल्हाद वाघमारे (रा. नढेनगर, काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.