- बारा जणांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२१) :- पिंपळे सौदागर येथे कोहिनुर प्रमोटर्सच्या नावे असलेली जमीन बळकावण्याच्या उद्देशाने आरोपींनी मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास बेकायदेशीर जमाव जमावला. तसेच शिवीगाळ करून काम करण्यास मज्जाव केला.
आरोपी व इतरांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत ‘तुम्ही जर इथे काम कराल तर आम्ही याच ठिकाणी स्वतः पेटवून घेऊन कुटुंबासह आत्महत्या करू’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना मंगळवारी (दि. १३) दुपारी पिंपळे सौदागर येथे घडली.
रामकिसन सखाराम पारटकर (वय ५०, रा. रहाटणी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश काटे, सुरेश जयवंत काटे, संतोष जयवंत काटे, शशिकांत काटे, उमेश मेदनकर, कार्तिक बाळासाहेब काटे, किरण रामदास पडाळे, साई बाळासाहेब काटे, आणि चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.