- पिंपरी चिंचवड शहरात फक्त या ८ केंद्रांवरच होणार लसीकरण…
- गरोदर मातांसाठी डोस नाहीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी (दि. १५) रोजी ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा फक्त दुसरा डोस हा १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी १०० टक्के कोविन अॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग ओपन होईल.
नवीन भोसरी रुग्णालय, फकीरभाई पानसरे उर्दु शाळा, चिंचवड स्टेशन, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ या चार लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने डोस मिळेल.
वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा फक्त दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवसानंतर देण्यात येणार आहे. वय ४५ वर्षावरील सर्व लाभार्थी यांचे लसीकरण हे लसीकरण केंद्रांना उपलब्ध करुन दिलेल्या लसीच्या क्षमतेनुसार ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने करण्यात येईल. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर सकाळी ०९.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये. या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी, अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा, इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड नवीन जिजामाता रुग्णालय या चार लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत १०० लाभार्थ्यांच्या क्षमतेने मिळेल.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थींना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. स्तनदा व गरोदर महिलांचेकोविड-१९ लसीकरण उद्या दि. १५/०७/२०२१ रोजी बंद राहील. “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसासाठा उपलब्ध नसल्याने या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.