- मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पंप मालकाशी झालेल्या भांडणाचा उल्लेख…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२१) :- भोसरीत एका पेट्रोल पंपावर तरून काम करीत होता. त्याने पेट्रोल पंपाच्या मालकाकडून काही रक्कम आगाऊ घेतली होती. त्यावरून त्यांच्यात वाद झाला.
पेट्रोल पंप मालकाने दुचाकी आणि मोबाईल फोन ठेऊन घेतला. यावरून भांडण झाले. राहत्या घरी तरुणाने छताला गळफास घेतला. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात पेट्रोल पंप मालकाकडून घेतलेल्या रकमेचा व भांडणाचा उल्लेख आहे. अंत्यविधीनंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. ही घटना मंगळवारी (दि. १३) दुपारी घडली. तेजस तावरे (वय २२, रा. भोसरी. मूळ रा. वाशी, जि. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.












