- डेंग्यूचा अहवाल निगेटिव्ह; पालिकेच्या आरोग्य विभागाकडून निर्वाळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसदस्या अर्चना तानाजी बारणे यांचे (दि. १३) खाजगी रुग्णालयामध्ये निधन झाले. त्यांचा मृत्यु हा डेंग्यु लागण झाल्याने झाला असल्याचे खाजगी रुग्णालयाने कळविले होते.
त्यांचा डेंग्यु निदानासाठी रक्तजल नमुना हा यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णायाच्या शासन मान्य सेंटिनल सेंटरमध्ये तपासणीसाठी पाठवला होता. सेंटिनल सेंटर येथून अहवाल पालिकेला (दि. १५) प्राप्त झाला आहे. हा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.
त्यामुळे अर्चना तानाजी बारणे यांचा मृत्यू डेंग्यु या आजाराने झालेला नाही, असे पालिकेने हे स्पष्ट आहे. रुग्णाच्या परिसरामध्ये १२५९ घरांचे कंन्टेनर सर्वेक्षण केलेले आहे. डास नियंत्रणाबाबतची कार्यवाही सुरु असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.