न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२१) :- पाटीलनगर, चिखली येथील राम मंदिरासमोर फोटो काढण्यासाठी फिर्यादी यांचे मित्र जाऊन थांबले असता तेथे आरोपी थांबला होता. त्यांच्यात अचानक भांडण सुरू झाल्याने फिर्यादी ते भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना कोयत्याने मारून जखमी केले.
ही घटना १२ जुलै रोजी दुपारी साडेपाच वाजता घडली. भीमा अशोक कांबळे (वय २०, रा. चिखलीगाव) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत शनिवारी (दि. १७) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास मोरे (रा. चिखलीगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.