न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ७ जाने) :- पिंपळे सौदागर येथील पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये क्रिडा सप्ताह समाप्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेड हाऊस व ग्रीन हाऊस या संघामध्ये कबड्डीचा अंतिम सामना पार पडला.
अटीतटीच्या सामन्यात रेड हाऊस संघाने विजय मिळविला. मुलींच्या रेड व ग्रीन हाऊस संघामध्ये बॅडमिंटन खेळाचा अंतिम सामना रंगला. यामध्ये ग्रीन हाऊस संघ विजेता ठरला. पालकांच्याही विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सर्वच पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद सहभाग नोंदवला. विजेत्या स्पर्धकांना मेडल्स व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले.
पूजा शेलार (राष्ट्रीय कबड्डी खेळाडू), सुनील सिध्दगवळी यांनी मुलांना मैदानी खेळाचे महत्व सांगून त्यांनीही या क्षेत्रात नाव मिळवावे याविषयी मार्गदर्शन केले. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे यांनी मुलांना अभ्यासाबरोबरच खेळाला महत्व द्यावे, असे सांगितले.
यावेळी दिपाली काजळे, उमेश तांबे, मुख्याध्यपिका दीपाली जुगुळकर, पर्यवेक्षिका संगीता पराळे आणि सविता आंबेकर शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा राठोड व शिल्पा गायकवाड यांनी केले.











