- सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयास देणार सदिच्छा भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२१) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा मानवहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष सचिनभाऊ साठे यांचे उद्या रविवारी (दि. २५) रोजी देहूरोडनगरीत आगमन होत आहे.
यावेळी ते देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट देणार आहेत.
विलास शिंदे म्हणाले, अण्णाभाऊंनी मातंग समाजात लेखणीव्दारे खऱ्या अर्थाने सामाजिक प्रगती व प्रेरणा निर्माण करणारी लोकचळवळ उभी केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या वंदनीय विभुतीचे कार्य सचिनभाऊंनी पुढे तेवत ठेवले आहे.
मातंग समाजाच्या उन्नतीसाठी व्यापक चळवळीला चालना देण्याचे कार्य ते करीत आहेत. राज्यातील दलित व मातंग समाजातील लोकांना सामाजिक प्रवाहात आणून त्यांना मानाचे स्थान मिळवून देत आहेत. अशा थोर व्यक्तित्वाचे स्वागत व सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.