- गरजूंना अन्नदान व गाई-बैलांना चाऱ्याचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२१) :- कोरोना महामारीमुळे अनेक लोकांचे व मुके प्राण्यांचे हाल होत आहेत. याची जाणीव ठेवत, प्राधिकरणातील जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने (दि. २६) ‘एक छोटीशी मदत’ हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत जिजाऊ प्रतिष्ठानकडून शहरातील गरजू लोकांना अन्नदान आणि भोसरी येथील पांजरपोळ ट्रस्टच्या गो-शाळेतील गायींना, बैल व वासरांसाठी घास-चारा दान करण्यात आला.
या मोहिमेत प्रतिष्ठानचे सभासद अमोल दाभाडे, अमोल गुंड, गणेश ताकमोगे, महेश ढवळे, अंजली कडेपवार, आशा आवटे, सरोजा कडेपवार, तुलसी कडेपवार, शुभम कडेपवार, उज्वला चौधरी, रेणुका शिंदे, आदेश गायकवाड, निलेश शेंडकर, अंजली पंद्री, जान्हवी पवार, दिपक गुप्ता, निती फार्मा आदींनी सहभाग घेतला.