- शारीरिक व मानसिक छळ; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२१) :- विवाहिता सासरी नांदत असताना पती, सासू आणि नणंद यांनी आपसात संगनमत करुन त्यांना माहेराहून पतीचे कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत अशी मागणी केली.
त्यासाठी वेळोवेळी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना २०१५ ते २६ जुलै २०२१ या कालावधीमध्ये वारुंजी फाटा, कराड येथे घडली. पीडित विवाहितेने सोमवारी (दि. २६) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पती राजेंद्र एकनाथ कारंडे, सासू व नणंद (तिघेही रा. वारुंजी फाटा, ता. कराड, जि. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















