- उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जुलै २०२१) :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडी शिवसेना विभागाच्या वतीने आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून काळेवाडी भागातील नागरिकांना कार्ड वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्डाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना पाच लाख रुपये चा आयु आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच विविध सोसायट्यांमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. ज्योतिबा नगर भागांमध्ये कोरोना महामारीच्या काळामध्ये दगावलेल्या नागरिकांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या वेळी पिंपरी चिंचवड शहर प्रमुख अल्पसंख्याक आघाडीचे शहरप्रमुख हाजी दस्तगीर मनियार, अखिल भारतीय कोळी महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष डी. एम. कोळी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पद्माकर जांभळे, सचिव सुरेश विटकर, प्रहार संघटनेचे रुग्णसेवक संजय गायके, मातोश्री संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर, ज्येष्ठ नागरिक एकनाथ काटे, प्रभाकर गुरव, श्री. वाघ, अशोक केदारी, दत्तात्रय भट आदी मान्यवर उपस्थित होते.
उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, विभाग प्रमुख गोरख पाटील, विभाग संघटक गणेश वायभट, उपविभाग प्रमुख अनिल पांलांडे, शाखाप्रमुख नरसिंग माने, शाखाप्रमुख सावताराम महापुरे, महिला आघाडीच्या विभागाच्या उपसंघटक शारदा वाघमोडे, ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेनेच्या महिला सदस्य सावता सावंत, सुजाता नखाते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
दरम्यान, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी शिवसेनेच्या रहाटणी-काळेवाडी विभागाच्या वतीने लवकरच जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक पाठविण्यात येणार असून परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सामाजिक भावनेतून मदत करण्याचे आवाहन हरेश नखाते यांनी यावेळी केले.
















