- तलवारी, दुचाकी व मोबाईलसह सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२१) :- दोन दुचाकीवरून चार आरोपी चालले होते. पोलिसांनी त्यांना अडवले असता त्यांच्याकडे तीन तलवारी मिळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडील तीन तलवारी, दोन दुचाकी आणि चार मोबाईल, असा एकूण एक लाख २४ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही घटना भगत वस्ती, भोसरी येथे मंगळवारी सायंकाळी घडली. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक सचिन विश्वास मोरे यांनी मंगळवारी (दि. २७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आकाश गुलाब गायकवाड (वय २५ रा. दिघीगाव), दादाहरी लक्ष्मण तांबे (वय २२, रा. एमआयडीसी भोसरी), आनंद नारायण कोलते (रा. गजानन नगर, दिघी) आणि अक्षय नाना जगदाळे (वय २० रा. विठ्ठलनगर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















