- चौघांना बेड्या; संत तुकारामनगरमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२१) :- संत तुकाराम नगर येथील शनिमंदिर चौकातून जात असताना आरोपींनी फिर्यादीच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकीची नंबर प्लेट तुटली. त्यामुळे फिर्यादीने आरोपींना ‘तुम्हाला गाडी व्यवस्थित चालवता येत नाही का’, असे विचारले. या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत हाताने आणि लहान मुलांच्या खेळण्याच्या सायकलने मारहाण करून जखमी केले.
त्यानंतर फिर्यादीने ‘तुमची पोलिसात तक्रार देतो’, असे म्हटले. या कारणावरून आरोपने लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. २७) दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी आयुष अमित कांबळे (वय १८, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश अजित कांबळे (वय १९), अर्षद सलीम शेख (वय १९, दोघे रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), लक्ष्मण कैलास वाघमारे (वय १९, रा. लालटोपीनगर, पिंपरी), राकेश राम गंजेळी (वय १९, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.