न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जाने.) :- चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने रविवार (दि. ६) रोजी काँग्रेसचे सरचिटणीस व खासदार राजीव सातव यांची पुणे येथे भेट घेतली.
यावेळी खासदार सातव यांना आमदार तथा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिकृती भेट देण्यात आली. यावेळी आबा खराडे, आमदार विश्वजित कदम, जयराम शिंदे, बलकवडे, सरिता जामनिक आदी उपस्थित होते.
याप्रसंगी चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे मा. अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी राजीव सातव यांना निवेदन दिले असून, यात आखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांना महाराष्ट्राचे दैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापुर वढू बु. येथील समाधीस तसेच तीर्थक्षेत्र आळंदी, देहू तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी गड व राजधानी रायगड या पवित्र स्थळी भेट देण्याची विनंती करण्यात आली. तसेच या दौऱ्यानिमित्त राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळेल, असेही नवले यांनी निवेदनात नमूद केले आहे.















