- देहूरोडचे सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे यांचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२१) :- देहूरोडचे सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे, भाजपाचे अनुसूचित मोर्च्याचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मनोज पवार यांनी पुढाकार घेत, मुंबई-बंगलोर महामार्गावरील कासेगाव येथे लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी जाण्यासाठी दिशादर्शक फलकाची उभारणी केली.
विलास शिंदे म्हणाले, तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहानशा गावात झाला होता. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. मात्र, या महापुरुषाच्या गावचा साधा फलकही महामार्गावर नसल्यामुळे अनेकांना पत्ता विचारातच प्रवास करावा लागत होता.
अण्णाभाऊंचे नातू सचिन साठे यांना सोबत घेऊन दिशादर्शक फलक उभारण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांनी लगेचच होकार देत संबंधित अधिकाऱ्यानां सूचना देत दिशादर्शक फलकाला मंजुरी मिळवली. १ ऑगस्ट अण्णाभाऊंच्या १०१ व्या जयंतीचे औचित्य साधत मुंबई-बंगलोर महामार्गावरील कासेगाव येथे या दिशादर्शक फलकाची उभारणी केली.
समाजाचे युवा नेते उत्तम मोहिते, संग्राम शिंदे, सूरज साठे यांनीही योगदान दिले. येथील ग्रामस्थांनी आभार त्यांचे मानले.