- पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोच्या कामाचा काही भाग ढासळला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्यासमोर मेट्रो स्थानक उभारण्यात येत आहे. सोमवारी काम सुरू असताना सिमेंटच्या विटांचा काही भाग ढासळून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कोसळला.
सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी वा जखमी झालेलं नाही. या महामार्गावरुन दररोज हजारो वाहन ये-जा असते. मात्र, जेव्हा विटा कोसळल्या त्यावेळी वाहन जात नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार आहोत, याची सेफ्टी डिपार्टमेंट चौकशी करणार आहे”, असे महा-मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले.