- वीस वर्षीय तरुणाला पिस्तुल व जिवंत काडतूसासह अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑगस्ट २०२१) :- उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यासाठी लग्नकार्यात पिस्तूलातून गोळीबार करण्याची पद्धत आहे. आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाइकांच्या लग्नात गोळीबार करता यावा, यासाठी आरोपीने पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ४० हजार ५०० रुपयांचा ऐवज उत्तर प्रदेशातून आणला. पोलीस तपासात हे उघड झालं.
आरोपीने पिस्तूलसह स्वतःचा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला. याबाबतची माहिती नागरिकाकडून गुंडा विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून आरोपीला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. २) चिंचवड येथे करण्यात आली.
गुंडा विरोधी पथकातील कर्मचारी विजय दत्तात्रय तेलेवार यांनी सोमवारी (दि. २) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सूरज सिंगसाहब जैस्वाल (वय २०, रा. सुभाष पांढारकर नगर, आकुर्डी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.