- फक्त ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा मोफत डोस उपलब्ध…
- अधिकृत लसीकरण केद्रांच्या ठिकाणांसाठी वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑगस्ट २०२१) :- ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय १८ ते ४४ वर्षे लाभार्थींना उद्या बुधवारी (दि. ४ ) रोजी पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण ३०० लाभार्थ्यापैकी २४० लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविनअॅपवर ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांचे करण्यात येईल. त्यातील पहिला डोस ५० लाभार्थी यांना कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व ५० लाभार्थी यांना पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर, दुसरा डोस हा १९० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व १० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे देण्यात येईल.
शहरातील सावित्रीबाई फुले, प्रायमरी स्कुल, भोसरी कै.ह.भ.प.प्रभाकरमल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी यमुनानगर रुग्णालय आचार्यअत्रे सभागृह वाय.सी.एम रुग्णालयाजवळ अहिल्याबाईहोळकर सांगवी मनपा शाळा खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव जुने जिजामाता रुग्णालय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय,चिंचवड, पुणे या लसीकरण केंद्रावर डोस मिळेल.
तसेच ‘कोव्हॉक्सीन’ लसीचा वय ४५ वर्षापुढील लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या एकुण ३०० लाभार्थ्यापैकी २७० लाभार्थ्यांचे लसीकरण हे ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे केले जाईल. त्यातील पहिला डोस हा ८० लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व २० लाभार्थी पिं. चिं. मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे तर, दुसरा डोस हा १९० लाभार्थी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व १० लाभार्थी पिं.चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकन प्रणालीव्दारे मिळेल.
प्राथमिकशाळा – ९२, मोरे वस्ती, म्हेञे वस्ती इ.एस.आय.एसहॉस्पीटल- मोहननगर, चिंचवड मासुळकरकॉलनी आय हॉस्पिटल नवीन भोसरी रुग्णालय
कासारवाडीदवाखाना अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पि. निलख दवाखानाजवळ प्रेमलोक पार्क दवाखाना या केंद्रावर लसीकरण होईल.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी दि. ०४/०८/२०२१ सकाळी ८.०० नंतर स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसासाठा उपलब्ध नसल्याने दि. ०४/०८/२०२१ रोजी या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही.