- तीन पीडितांची सुटका; दोन महिलांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑगस्ट २०२१) :- वाकडच्या भुमकर चौकात क्रॉसरोड मॉल येथे असलेल्या स्पा सेंटरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.
आरोपी दोन महिला या पीडित तीन महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. ३) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिला आरोपी (रा. अहमदनगर), महिला आरोपी (रा. तळेगाव दाभाडे) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.