- ४८ हजार ४०० रुपयांचा गुटखा जप्त; भोसरीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२१) :- विक्री करण्याच्या उद्देशाने तरुणाने गुटखा जवळ बाळगला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ४८ हजार ४०० रुपयांचा गुटखा जप्त केला.
दिघी रोड, भोसरी येथे बुधवारी दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलीस कर्मचारी आशिष मल्लेश गोपी यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सागर अशोक गायकवाड (वय २१, रा. वाल्हेकरवाडी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.पोलीस उपनिरीक्षक रवी भवारी तपास करीत आहेत.