- एकाची पन्नास लाखांची फसवणूक; पिंपळे गुरवमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२१) :- प्रिन्स बिझनेस फायनान्स लोन कंपनीकडून पाच टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देतो, असे फिर्यादीला सांगितले. त्यासाठी आरोपीने कर्ज रकमेच्या दहा टक्के म्हणजे ५० लाख रुपये फिर्यादीकडून घेतले. पैसे घेऊन त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले नाही.
तसेच दिलेली रक्कमही परत न देता फसवणूक केली. हा प्रकार पिंपळे गुरव येथे १ ऑक्टोबर २०२० रोजी घडला. लक्ष्मण शिवाजी चव्हाण (वय ६०, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी बुधवारी (दि. ४) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश सुखलाल साळुंखे (रा. एरंडवणे, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.