- पिस्तुलासह सात लाखांच्या मुद्देमालाची चोरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२१) :- घराचे गेट आणि दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटातून एक पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, रोख रक्कम, तीनशे एक ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने आणि घड्याळ असा एकूण सात लाख ३२ हजार ७२० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
हा प्रकार शनिवारी (दि. ७) सकाळी गणेशनगर, बोपखेल येथे उघडकीस आला. शिवाजी गंगाराम शिंदे (वय ५६, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.












