- रत्नागिरी व चिपळूणच्या दुर्घटनाग्रस्त भागात पोहोचून केले मदतकार्य..
- मनसैनिकांचा हिरारीने सहभाग – सचिन चिखले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२१) :- कोरोनाच्या संकटातून सावरत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पूर आणि भूस्खलनाचा मोठा फटका बसलाय. रत्नागिरीसह चिपळूनमधील अनेक भागमध्ये जलप्रलय तर घरांवर दरड कोसळल्यानं अनेक जण बेपत्ता होती. कोकणातील आपल्या आप्त व नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पिंपरी चिंचवड शहर मनसे व शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी बाधीतांपर्यंत जीवनावश्यक मदत तातडीने पोहोचविण्यासाठी मदतकार्य सुरु केले. पूरग्रस्तांची खरी गरज पाहून स्व-खर्चातून व शहरातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून जीवनावश्यक वस्तू, मेडिकल व इतर उपयोगी वस्तूंच्या कीटचे मदतकार्य घेऊन ते स्वतः शनिवारी (दि. ०७) रोजी कोकणातील रत्नागिरी व चिपळूणच्या दुर्घटनाग्रस्त भागात पोहोचले व मदतकार्य पोहोच केली.
याबाबत माहिती देताना सचिन चिखले न्यूज पीसीएमसीशी बोलताना म्हणाले, पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हाकेला साद देत, शहर मनसेने कोकण पुरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतला. प्रामुख्याने पुरग्रस्तांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तु, भांडी, अन्नधान्य, साड्या, औषधे, गुडनाईट/मॉर्टिन कॉइल, बिस्किटे, बिसलेरी पाणी, फिनेल, साबन व आदी वस्तूंच्या कीटचे गरजूंना वाटप केले. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या मदतीने रत्नागिरीतील खेड तालुक्यातील कुंभारवाडा आणि ब्राम्हण आळी तसेच चिपळूण तालुक्यातील चारगाव खांदाट, भोईवाडी, दळवटणे बागवाडी, इंगवलेवाडी, खेर्डी एम.आय.डि. सी. मफतलाल चाळ, खेर्डी मोहल्ला, खेर्डी सुर्वे चाळ या ठिकाणी जवळपास १० टनाचे मदतकार्य दुर्घटनाग्रस्तांपर्यंत पोहोचविले.
यात मनसेचे राजू सावळे, विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, सचिन मिरपगार, तेजस दाते, सुरज जाधव, नितिन शिंदे, अविनाश तरडे, स्वप्निल महांगरे, प्रवीण माळी, निलेश ननावरे, भरत क्षेत्रे, आकाश जाधव, नारायण पठारे, निलेश पवार, रोहिदास शिवनेकर, मंगेश भालेकर, सतीष सामनगावे, समाधान केंद्रे, अविनाश एकंबे, श्रावण गोयल, श्रद्धा देशमुख, सोनाली गावडे, अभिषेक गावडे, सुभाष पाटिल, विपुल काळभोर, ओंकार काळभोर, रोहित भोकरे, जय सकट, प्रदीप घोड़के , प्रविण सोलंकी या मनसैनिकांनी हिरारीने सहभाग घेतला.
















