- मारहाणीत तरुणाचा मृत्यू; दोघांना अटक, चारजण फरार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२१) :- पिंपरीतील डीलक्स चौकात आरोपींनी संगनमत करून तरुणाला लाथा बुक्क्यांबरोबरच खुर्ची, लाकडी दांडके आणि लाकडी स्टंपने बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तीन दिवसांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, ‘तू वेडा आहेस’ असे आरोपी त्याला चिडवायचे.
‘मी वेडा नाही’ असं तरूण वारंवार सांगून देखील आरोपी सुधारत नव्हते. यामुळे तरुण दुखावला गेला होता, त्याने आरोपींसोबत वाद घातला. पुष्पा राजू कसबे यांनी फिर्याद दिली असून पिंपरी पोलिसांनी सचिन निकाळजे, शौकत समीर शेख, चिम्या उर्फ सुरेश निकाळजे, मनोज अर्जुन जगताप, आनंद कदम, संतोष कदम, भूषण डुलगल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर, इतर आरोपी फरार आहेत. पिंपरी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
















