- वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२१) :- अतिक प्रायव्हेट लिमिटेड नावाची औषध विक्री एजन्सी असल्याचे भासवून AMPHOTERICIN-B हे इंजेक्शन देतो असे सांगितले. फिर्यादीकडून ८० हजार रुपये गुगल पे द्वारे मागितले. पैसे घेऊनही इंजेक्शन दिले नाही. पैसेही परत केले नाहीत. फिर्यादीची फसवणूक केली.
हा प्रकार १६ मे ला थेरगाव येथे घडला. तेजेश तानाजी अंधारे (वय २८, रा. थेरगाव) यांनी रविवारी (दि. ८) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जयसिंग उर्फ जयेश कल्याण डोळे (रा. पिंपरखेड, ता. जामखेड, जि. अहमदनगर) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















