- जीवनावश्यक व आरोग्यविषयक वस्तूंचे ट्रकभर कीट महाडकडे रवाना..
- प्रा. दत्तात्रय भालेराव मित्र परिवाराचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील अजमेरा-मोरवाडीतील प्रा. दत्तात्रय भालेराव मित्र परिवार, ज्येष्ठ नागरिक संघ आणि किलबिल परिवार कोकणच्या महाडमधील दुर्घटनाग्रस्त बांधवांच्या मदतीला धावून आला आहे. उद्भवलेल्या पूर परिस्थितीत तेथील नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना आधार देत, त्यांचे अश्रू पुसत त्यांना विविध वस्तू, खाद्यपदार्थ, धान्याची व आरोग्यविषयक सर्व औषधांच्या किटची कुमक नुकतीच त्यांनी कोकणाकडे रवाना केली आहे.
त्याप्रसंगी शिवसेना आमदार भरत गोगावले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, शिवसेना भोसरी विधानसभा समन्वयक प्रा. दत्तात्रय भालेराव, निवेदक कोकाटे, राजेन्द्र खोसे, सुहास शिंगोटे, ज्ञानेश्वर शेळके, धनेश गांजवे, प्रदीप वानरे आदी उपस्थित होते.

या मदतकार्यात प्रा. दत्तात्रय भालेराव मित्र परिवार व शिवसेना विभाग प्रमुख गोरख नवघणे, विपुल रोकडे, विपुल टेहरे, ज्येष्ठ नागरिक संघ म्हाडा, मोरवाडीतील बी. आर. माडगूळकर, यशवंत आपटे व किलबिल गार्डन परिवाराचे जीवन पिसे, निंबुळकर, संजय सदगर तसेच उद्योजक सीताराम शेट्टी, सुरेश चावला, चंद्रकांत सहाणे, अरुण खनकर, संजय शिंदे, शैलेश बाणखेले, योगेश मगर, पंडित वानी, प्रीती देशपांडे, जगन्नाथ अलहात, दीपक नेगी, हनुमंत गुळ्याड, विष्णू शेळके, भावना आहुजा, सुरेश साकेगावकर, माधव कोडपे, सुनील नाद गवंडी, गोविंद पाटील, शिवाजीराव जाधव, निसर्ग हौ सोसायटी, म्हाडा कॉलनी सदस्य व सुजय जेनरिक मेडिकल स्टोअर्सच्या संचालिका सौ वर्षा दत्तात्रय भालेराव यांनी मोलाचे सहकार्य केले.
याबाबत माहिती देताना प्रा. भालेराव म्हणाले, कोकणात आस्मानी संकट, महापूर, दरडी कोसळून हाहाःकार माजला होता. अनेक भागात मुसळधार पावसाने थैमान घालत, अनेकांचे बळीही घेतले. आता पाउस थांबला आहे. परिस्थिती निवळत असताना जीवनावश्यक व आरोग्यविषयक साहित्याची निकड भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माध्यमातून अजमेरा-मोरवाडी परिसरातील व आरोग्य क्षेत्रातील दानशूरांना कोकणातील महाडमधील बांधवांसाठी वस्तुरूपी मदतीचे आवाहन केले होते. अल्पावधीतच आवाहनला प्रतिसाद मिळाला. किरणा साहित्य, तांदूळ, साखरेची गोणी, तेलाचे डबे, लहान मुलांसाठी खाऊ, पाण्याच्या बाटल्या, कपडे, सॅनिटरी नॅपकीन, चादरी, मेणबत्ती, खाद्यपदार्थ, औषधे अशा विविध वस्तूंच्या कीटची ट्रकभर मदत नुकतीच महाडला पाठवली आहे. नुकसानग्रस्त बांधवाना किमान पंधरा ही मदत पुरेल, असे भालेराव म्हणाले.















