- दोन लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२१) :- ऑफिसमध्ये प्रवेश करून रोख रक्कम व मोबाईल असा एकूण दोन लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. झेप इंटेरियर डिझाईनिंग ऑफिस पाटील प्लाझा चिंचवड स्टेशन येथे शनिवारी (दि. ७) ते सोमवार (दि. ९) दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला.
सागर पुरुषोत्तम गुंजाळ (वय ३५, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















