- रावेत, म्हाळुंगे, शिरगाव चौक्यांना पोलीस ठाण्यांचा दर्जा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२१) :- पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलाला आणखी तीन वरिष्ठ अधिकारी मिळणार आहेत. शासनाने त्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार एक अपर पोलीस आयुक्त तसेच दोन पोलीस उपायुक्त अशा तीन पदांना मान्यता देण्यात आली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली.
आर.के.पद्मनाभन यांनी रावेत, म्हाळुगे (चाकण), तसेच शिरगाव चौक्यांना पोलीस ठाण्यांचा दर्जा दिला होता. तसेच पोलीस ठाणे म्हणून मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता राज्याच्या वित्त विभागाकडूनही मान्यता मिळाली आहे.
















