- चिखली घरकुलातील लाभार्थ्यांना स्वहिस्सा भरण्यासाठी मुदतवाढ..
- शहरातील ६३ कोटींच्या कामांना स्थायीची मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑगस्ट २०२१) :- महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या झालेल्या आणि येणा-या सुमारे ६३ कोटी ६४ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, केंद्रशासन व राज्यशासनाच्या सहकार्याने चिखली येथे राबविण्यात येत असलेल्या घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठीची मुदत ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढविण्यास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.
ग प्रभागातील थेरगाव येथील नविन आणि पिंपरी येथील जिजामाता हॉस्पिटल मध्ये कोरोना वार्ड करीता आय.सी.यु.मध्ये यु.पी.एस. यंत्रणा बसविणेबाबत येणा-या ४९ लाख ७१ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.६ मधील सदगुरुनगर, लांडगेवस्ती परिसरात पावसाळी गटरची सुधारणा करण्यासाठी येणा-या ३१ लाख ७ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. जाधववाडी परीसरातील प्रभाग क्र.२ मधील विविध रस्ते मध्यदुभाजक सुशोभिकरण करणे आणि २ वर्षे देखभाल करणे या कामासाठी येणा-या ४५ लाख ८४ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील दैनंदीन कामकाजासाठी, निर्जंतुकीकरणासाठी बॅक्टोडेक्स जंतुनाशक/दुर्गंधीनाशक औषध खरेदीकामी येणा-या १ कोटी ३८ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. कासारवाडी येथे ३० मीटर एचसीएमटीआर रस्त्यावर सी.डी. वर्क बांधणेकामी येणा-या ५ कोटी ६३ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१६ मधील शिंदेवस्ती, जाधववस्ती व गुरुद्वारा परिसरातील ओपन गटार बंदिस्त करणे आणि स्थापत्य विषयक कामे करण्याकामी येणा-या ३६ लाख २८ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. शहरातील पाणी नमुने त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करून घेणे अनुषंगिक कामे करण्यासाठी येणा-या ३२ लाख ९० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. पाणीपुरवठा विभागामार्फत आंद्रा भामा आसखेड प्रकल्पांतर्गत तळवडे येथे नदीजल उपसा केंद्र उभारणेत येत आहे. येथे उच्चदाब वीजपुरवठा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कंपनीस वीजपर्यवेक्षण आणि इतर शुल्क यासाठी येणा-या ६९ लाख ९६ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
पाणीपुरवठा विभागामार्फत आंद्रा भामा-आसखेड प्रकल्पांतर्गत चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारणेत येत आहे. सदर जलशुद्धीकरण केंद्रामधील फिल्टर यंत्रणा, केमिकल विभाग, पाणी निवळण यंत्रणा (सीएलएफ) इ. ठिकाणी विजेवर चालणा-या विविध यंत्रणा बसविण्यात येणार आहेत. याकामासाठी वीजभार जोडणी करण्याकरीता महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ कंपनीस देण्यात येणा-या ९६ लाख ७० हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
मुळा नदीवर सांगवी – दापोडी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नविन पूल उभारण्यात येणार आहे. या निविदा प्रक्रियेत मे. टी. ॲण्ड टी. इन्फ्रा लि. यांची ३०,९९,०००००/- रुपयांची (तीस कोटी नव्यान्नव लाख रुपये) लघुतम निविदा प्राप्त झाली होती. सांगवी – बोपोडी येथे मुळा नदीवर नवीन पूल उभारण्यासाठी स्थापत्य विभागाकडून ४०,८०,०७३७६ रुपयांची (चाळीस कोटी एैंशी लाख सात हजार तीनशे शह्यात्तर रुपये) निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. निश्चित केलेल्या मुदतीत नऊ कंपन्यांनी आपल्या निविदा सादर केल्या. यामध्ये टी. ॲण्ड टी. इन्फ्रा. लि. या कंपनीने लघुतम निविदा भरल्यामुळे त्यांची निविदा मंजूर करण्यात आली.













