न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२१) :- नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आज ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण करून ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नोवेल इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन अमित गोरखे उपस्थित होते.
कोट्यवधी देशभक्तांच्या त्याग, बलिदान, समर्पणातून मिळालेलं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखण्याचा आपण सर्वजण पुन्हा एकदा दृढनिश्चय करु या,’ असे आवाहन करीत गोरखे यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी पिंपरी-चिंचवड शहराच्या नगरसेविका अनुराधाताई गोरखे, समिर जेऊरकर, सर्व शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होते.