न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑगस्ट २०२१) :- काका’स इंटरनॅशनल स्कूल, तापकीरनगर येथे ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्सहात साजरा करण्यात आला. शाळेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर हनुमंत तापकीर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दरम्यान १० वी, १२ वी च्या ८० ते ९० टक्के व ९० ते १०० टक्के गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह (ट्रॉफी) देऊन गौरविण्यात आले.
यावेळी स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर, शाळेच्या मुख्यध्यापिका बबिता नायर, संचालक नवीन तापकीर, निलेश तापकीर हर्षल तापकीर, राम तापकीर, गणेश भोसले, राहुल बनकर, अतिष कांबळे, गोवर्धन कारंडे, अशोक पाठक, शंकर शिनगारे, ओंकार पाठक, विकी पाटील, निलेश तापकीर मित्र परिवार व इतर प्रमुख पाहूणे उपस्थित होते.