- प्रभागनिहाय लसीकरण केंद्र; वयोगट व डोसच्या संख्येसाठी वाचा….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२१) :- ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोस नंतर २८ दिवस झालेल्या वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना गुरुवारी (दि.१९) रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या KIOSK टोकनप्रणालीव्दारे एस. एम.एस. संदेशप्राप्त नागरिकांना देण्यात येईल.
त्यात पहिला डोस हा १० लाभार्थी कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने व उर्वरित लाभार्थी पिं. चिं.मनपा केंद्रीय KIOSK टोकनप्रणालीव्दारे तर, दुसरा डोस हा ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पद्धतीद्वारे मिळेल.
वयोगट वय वर्षे १८ ते ४४ व ४५ – लसीकरण केंद्र व दोन्हीची एकत्रित डोसची संख्या….
अ प्रभाग – कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पीटल, आकुर्डी – एकूण डोस – ९००
ब प्रभाग – क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले (जुने तालेरा) रुग्णालय, चिंचवड – एकूण डोस – ८००
क प्रभाग – मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल – एकूण डोस –६००
ड प्रभाग – जुने खिवंसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव – एकूण डोस – ७००
ड प्रभाग – पिंपळे निलख इंगोले मनपा शाळा, पिं.निलख दवाखानाजवळ – एकूण डोस – ६००
इ प्रभाग – नवीन भोसरीरुग्णालय – एकूण डोस –५००
इ प्रभाग – सावित्रीबाईफुले, प्रायमरीस्कुल, भोसरी – एकूण डोस – ४००
इ प्रभाग – अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी – एकूण डोस – ७००
फ प्रभाग – यमुनानगर रुग्णालय – एकूण डोस – ६००
ग प्रभाग – जुने जिजामाता रुग्णालय – एकूण डोस – ६००
ह प्रभाग – निळु फुले नाटयगृह, पिंपळे गुरव – एकूण डोस – ७००
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं.५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी (दि. १९) सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. “कोव्हिशील्ड” लसीचा पुरेसासाठा उपलब्ध नसल्याने दि. १९/०८/२०२१ रोजी या लसीचे लसीकरण करण्यात येणार नाही.