- कोविड लसीचा पुरेसा साठा नसल्याने पालिकेचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२१) :- कोविड १९ या आजारावर शासनाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांप्रमाणे वय १८ वर्षापुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे कोविड लसीकरण महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर करण्यात येत आहे.
कोविड-१९ लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे शुक्रवार दि. २० ऑगस्ट २०२१ रोजी बंद राहतील, असे पालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले.


















