- महापौरांच्या हस्ते उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२१) :- प्रभाग क्रमांक २७ येथे काळेवाडी फाटा ते एमएम शाळेपर्यंतचा रस्ता बीआरटीएसद्वारे अर्बन स्ट्रीट डिझाईन अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. त्याचा भूमीपूजन समारंभ तापकीर चौक येथे महापौर उषा ढोरे यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला.
यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, नगरसेविका सुनिता हेमंत तापकीर निर्मला कुटे, नीता पाडाळे, सविता खुळे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, कैलास बारणे, बाबा त्रिभुवन, स्वीकृत सदस्य विनोद तापकीर, चिंचवड विधानसभा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राजदादा तापकीर आदी उपस्थित होते.
नागरिकांना चालण्यासाठी प्रशस्त फुटपाथ, सायकल ट्रॅक, समांतर पार्किंग, हॉकर्स झोन, मोटर व्हेईकल लेन आदींचा या कामात समावेश आहे. या अर्बन स्ट्रीट डिझाईनचा शहरातील सायकलस्वरांना, शाळेतील विद्यार्थी, वृध्द व्यक्ती यांना उपयोग होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडणार असल्याची माहिती राज तापकीर यांनी दिली. नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत नखाते व राज तापकीर यांनी या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला.