- आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण, सेल्फी पॉइंटची तोडफोड; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२१) :- नेहरूनगर येथील विठ्ठलनगर येथे १७ एप्रिलला दुपारच्या दरम्यान लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू होते. तेव्हा, अचानक एक महिला हातात चाकू घेऊन आली अन लोकांचे लसीकरण करू नका त्यांना तुम्ही मारायला आलात असं म्हणत आरोग्य कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली.
आरोपी महिलेने सेल्फी पॉइंटची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना खुर्चीने मारहाण केली. पिंपरी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप महिलेला ताब्यात घेण्यात आलेलं नाही अशी माहिती गुन्हे पोलीस निरीक्षक मिसाळ यांनी दिली आहे.