न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२१) :- चिंचवड येथील सुरज ऊर्फ ससा वाघमारे टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १६ जुलै रोजी मोक्काची कारवाई केली होती. त्या गुन्ह्यात आरोपी फरार होता.
पोलीस नाईक आशिष बोटके आणि पोलीस हवालदार कानगुडे यांना माहिती मिळाली की, आरोपी मोदीखाना सोलापूर येथे आहे. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने सोलापूर येथे जाऊन सदर बाजार पोलीस ठाणे, सोलापूर पोलिसांच्या मदतीने चिंतलवार वस्ती, मोदीखाना सोलापूर येथून आरोपीला बुधवारी (दि. १८) सायंकाळी सहा वाजता ताब्यात घेतले.
त्याला पुढील तपासासाठी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. राजा सिद्राम माडेकर (वय २६, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
















